मंदीरातील कार्यक्रम

मंदीरातील कार्यक्रम

श्रींचा प्रकटवार रविवार असल्याने श्रीं चा पालखी सोहळा रविवार रात्री ठिक ८.३० ते ९.०० या वेळेत होतो तोफेची सलामीनंतर श्रीं ची स्वारी मंदीरात येते पावसाळ्यात ७ जून ते खंडेनवमी पर्यंत पालखी सोहळा बंद असतो.
याशिवाय नवरात्रामध्ये साजरा होणारा नवरात्र सोहळा शारदीय नवरात्रापेक्षा वेगळा पण वैशिष्टपूर्ण असतो.

मंदीरात वर्षभर अनेक कार्यक्रम साजरे होत असतात.यामध्ये दोन महायात्रा भरतात.
१.चैत्र यात्रा.
२. श्रावण षष्ठी यात्रा.
या यात्रांचे वैशिष्ट म्हणजे दोन्हीही यात्रा शक्तींची यात्रा होत चैत्र यात्रा मूळमाया यमाईची क्षावणषष्ठी आदीयात्रा चौपडाईची होय.

मंदीरात वर्षभर साजरे होणारे कार्यक्रम
१.चैत्रमहिना – चैत्रमहिन्याला या क्षेत्री खूप महत्व आहे.कारण श्रीं चा प्रकट दिन याच महिन्यात चैत्र शु.सप्तमीला असतो.
चैत्र शु.नवमीला मंदीरात रामनवमी उत्सव साजरा होतो.
या दिवशी श्रींची रामरूपात पूजा बांधली जाते.
चैत्र शु.पोर्णिमेला या तिर्थक्षेत्रातील सर्वांत मोठी व मुख्य यात्रा भरते ती म्हणजे चैत्री यात्रा.
चैत्री यात्राचा मुख्य दिवस म्हणजे (हस्त युक्त पोर्णिमा असेल तर उत्तम)

2.षष्ठी यात्रा : या तीर्थक्षेत्राची दुसरी मोठी व महत्वाची यात्रा म्हणज षष्ठीयात्रा.या यात्रेला अध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्व आहे.ही यात्रा म्हणजे रत्ना सुरावरील आदीमाया आदिशक्ती चर्पटअंबेचा विजय सोहळा होय.याचदिवशी चर्पट अंबेने मैनगिरीचा राक्षसराज व अत्यंत बलशाली रत्नासुराचा मध्यरात्री वध केला.

4 comments

  1. maheasmanushinde

    i love jotaba

  2. anil ravsaheb ghodake

    me and my family is always thankful of jyotiba to give happyness. so me and my family are loves to jyotiba. ” Jyotibachya navan CHANGBHAL!”

  3. Sanjiv Neval

    jyotibachya navane changbhal…..
    ज्योतिबाच्या नावन चांगभल…..

Leave a Reply

Powered By Indic IME